Breaking News

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये 19 कामकाजाचे दिवस असणार आहेत, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्टदरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. ती मान्य करण्यात आली असून या अधिवेशनात सरकार अनेक बिले सादर करू शकते.
अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाणार असून संसदेत प्रवेश करणार्‍या प्रत्येकाने कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला आहे का हे तपासले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply