Breaking News

मियामी ओपनचे अ‍ॅश्ले बार्टीला विजेतेपद

मियामी (अमेरिका) ः वृत्तसंस्था

मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीने विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात बार्टी आणि कॅनडाची बिआन्का अँड्रेस्कू आमनेसामने आले होते, मात्र दुखापतीमुळे बिआन्काने माघार घेतली. त्यामुळे बार्टीला विजेता घोषित करण्यात आले. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या बार्टीने पहिला सेट 6-3 असा नावावर केला. दुसर्‍या सेटमध्येही ती 4-0 अशी पुढे होती, मात्र या सेटदरम्यान बिआन्काला उजव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तिला रिटायर्ड हर्ट होऊन सामन्यातून बाहेर व्हावे लागले. त्यामुळे बार्टी विजेती ठरली.

मला अंतिम सामना असा खेळायचा नव्हता. अँड्रेस्कूबद्दल वाईट वाटते. मला आशा आहे की, ती लवकरच ठीक होईल.

-अ‍ॅश्ले बार्टी

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply