पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात आता रविवार सोडून दरदिवशी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. गुरुवार (दि. 8) पासून ही सुविधा राबविण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली.
सध्या ज्येष्ठ नागरिक, 45 वयोगटावरील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू आहे. तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी लसीकरण केले जात होते. त्या वेळी मोठी गर्दी होत होती. तसेच काही जणांना लस न मिळाल्याने पुन्हा परतावे लागत होते. मात्र आता दोन्ही आरोग्य केंद्रात रविवार सोडून रोज लसीकरण होणार असून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 100 जणांना म्हणजे तालुक्यात 200 जणांना रोज लस दिली जाणार आहे.