पाली : प्रतिनिधी
शिवकालीन विविध प्रकारची शस्त्रे ग्रामीण भागात दृष्टीस पडणे, म्हणजे एक पर्वणीच. सुधागड तालुक्यातील पेडली गावात सॅम मित्रमंडळाच्या वतीने नुकतेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
शिवकालीन तलवार, कट्यार, बिचवा, भाला, ढाल, दांडपट्टा आदी शिवकालीन विविध प्रकारची शस्त्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. त्यांची संपूर्ण माहितीदेखील या वेळी देण्यात आली. सुधागड तालुक्यासह इतर ठिकाणच्या नागरिकांनीही या शस्त्रांच्या प्रदर्शनास भेट देऊन शिवकालीन इतिहासाची माहिती करून घेतली. या वेळी शिवचरित्र व्याख्यान, रक्तदान शिबिर व कोरोना योद्ध्यांचा सन्मानदेखील करण्यात आला. पेडली विभागातील सर्व शिवप्रेमींनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.