Breaking News

भाजप नेत्याच्या प्रयत्नामुळे बेपत्ता मुलगी सुखरूप सापडली

पनवेल : रामप्रहर वृत्त

खतीजा सिद्दीकी ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने कळंबोलीमध्ये मोठी खळबळ माजली, परंतु ही बाब भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांच्या पाठपुराव्यानंतर चार दिवसांनी ही मुलगी सुखरूप सापडली.  खतीजा ही 15 वर्षाची मतिमंद मुलगी कळंबोलीमधील कृष्णा टॉवरमध्ये कुटुंबासह राहते. तेथून खतीजा बेपत्ता झाली. सगळीकडे शोधाशोध घेतल्यावर ती न सापडल्याने कळंबोली पोलिसांत तक्रार दखल करण्यात आली. दोन दिवस काहीही तपास कामात प्रगती नसल्याचे पाहून त्यांनी पत्रकार व भाजप नेते सय्यद अकबर यांच्याकडे धाव घेतली. सय्यद अकबर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या कानावर विषयाचे गांभीर्य विषद केले. संजय पाटील यांनी त्वरित हालचाल सुरू केली. विशेष पथक नेमून तपासाला वेग दिला. खतीजाला मानसरोवर रेल्वे स्टेशनजवळ पहिल्याचे काहीजणांनी सांगितले. अखेर सिवूड दारावे परिसरात सहाव्या दिवशी एक महिला रिया अब्दुल कादिर नाडर यांच्या किचन डिलाईट हॉटेल सिवूड ईस्ट येथे त्यांना खतीजा दिसली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट पाहिली होती. त्यामुळे त्यांनी लगेचच फोनवर खतीजा सिवूडला असल्याचे पोलीस व नातेवाईकांना कळवले. पत्रकार इरफान शेख यांनी नेरूळ आणि तिथल्या व्हॉइट्सअप ग्रुपवर सर्व माहिती टाकल्याने हा प्रकार सर्वांना कळला होता. खातीजाला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर सर्वजण भावनाविवश झाले. खातीजाचे आजोबा आणी सर्वांनी सय्यद अकबर यांचे मनोमन जाहीर आभार मानले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी किचन डिलाईटच्या रिया नाडर कुटुंबाचे आभार मानले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply