Breaking News

कोरोना संकटात पाणीटंचाईच्या झळा

रायगडात 157 गावे, वाड्यांना टँकरने जलपुरवठा

अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोना संकटात रायगड जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील 157 गावे आणि वाड्यांमधील 16 हजार 855 नागरिकांना 27 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल, मे महिन्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होत असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन केले करून 11 कोटी 39 लाख रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला होता. या आराखड्यात टंचाईग्रस्त गावे वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासोबत नळ पाणी योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरी खोदाई, विहिरींमधील गाळ काढणे तसेच इतर उपाययोजनांचा समावेश करण्यात आला होता.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे जिल्ह्यात विशेषकरून कर्जत, खालापूर, पेण, महाड, पोलादपूर या पाच तालुक्यांतील 28 गावे व 129 वाड्यांवर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या गावे व वाड्यांना 27 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply