Breaking News

नेरळ येथील जाहिरात कंपनीची पंचविशी

कर्जत : बातमीदार

रायगड जिल्ह्यातील पहिली आउटडोअर जाहिरात कंपनी म्हणून 1996 मध्ये काम सुरू केलेल्या साई अ‍ॅडव्हटायझिंग या कंपनीने 25 वर्षे पूर्ण केली आहेत. ग्रामीण भागातून काम सुरू करणार्‍या या जाहिरात कंपनीने ग्राहकांची विश्वासहर्ता मिळवत ही मजल मारल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

भविष्यातील गरज ओळखून व्यवसायाला सुरुवात करणार्‍या साई अ‍ॅडव्हटायझिंग या जाहिरात कंपनीने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक येथे पहिला जाहिरात बोर्ड उभा करून या क्षेत्रात पाऊल टाकले. माथेरान येथील बाईक या रिसॉर्टने पहिली जाहिरात दिली आणि साई अ‍ॅडव्हटायझिंगचा उदय झाला. पनवेल येथे आयटीआयमध्ये शिक्षण घेत असताना ला शिकत असताना तिथले मोठे होर्डिंग बघून कायम प्रश्न पडायचे आणि त्याच क्षेत्रात व्यवसाय उभा केला.

साई अ‍ॅडव्हटायझिं या जाहिरात कंपनीला 25 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात तबलावादक आणि गायक विवेक दहिवलीकर तसेच डोंबिवलीचे मेनन, माथेरानचे चंद्रकांत काळे आदी कलाकारांनी बहारदार गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, प्रशाकीय अधिकारी किरण पाणबुडे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, अ‍ॅड. राजेंद्र येरुणकर आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply