Breaking News

गुड न्यूज! स्पुटनिक लस 1 मे रोजी होणार भारतात दाखल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोना विषाणूविरोधात प्रभावशाली ठरलेली रशियाची बहुचर्चित स्पुटनिक-व्ही लस भारतात दाखल होणार आहे. 1 मे रोजी या लसीची पहिली खेप भारतात दाखल होईल, अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)चे प्रमुख किरील दमित्रिव यांनी दिली. दरम्यान, याच दिवसापासून भारतात तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे.
दमित्रीव म्हणाले, स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारताला 1 मे रोजी पाठवण्यात येईल. यामुळे भारताला कोरोना महामारीवर मात करण्यात मदत मिळेल. आरडीआयएफ सध्या जगभरात स्पुटनिक व्ही लसीची मार्केटिंग करीत आहे. दरम्यान, आरडीआयएफने पाच बड्या भारतीय लस उत्पादक कंपन्यांसोबत वार्षिक 85 कोटींहून अधिक लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. त्याचबरोबर भारतात लवकरच या लसीचे उत्पादनही सुरू होऊ शकते, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
अनेक देशांकडून मदत
भारतात सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. रुग्ण मोठ्या संख्येने रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याने बेड, ऑक्सिजन, तसेच इतर वैद्यकीय उपकरणांची मोठी कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देशांकडून मदत पाठवली जात आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, प्री फेब्रिकेटेड मोबाइल फिल्ड हॉस्पिटल आणि प्रयोगशाळा यासह आवश्यक उपकरणे आणि इतर मदत दिली जात आहे. याशिवाय दोन हजारहून जास्त कर्मचारी भारतात काम करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply