Breaking News

ज्येष्ठ पत्रकार राजेश भिसे यांचे निधन

पाली ः प्रतिनिधी
नागोठणे येथील ज्येष्ठ पत्रकार व दै. रामप्रहरचे प्रतिनिधी  राजेश भिसे यांचे सोमवारी (दि. 3) कोरोनामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी, कामगार, शोषित, पीडित वर्गाचे विविध प्रश्न व समस्यांना आपल्या लेखणीतून न्याय देण्याचे काम भिसे यांनी केले. अनेक लढे, आंदोलनांत त्यांनी सातत्यपूर्ण लिखाण करून अन्यायग्रस्तांची बाजू ठामपणे मांडली होती. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply