Breaking News

काँग्रेसचे टूलकिट खतरनाक

भाजप आमदार अतुल भातखळकरांची गंभीर टीका

मुंबई : प्रतिनिधी

टूलकिट प्रकरणावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप केले. संकटातही काँग्रेस राजकारण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेवर गंभीर टीका केली आहे.

काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस, असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भारताचा नंबर वन शत्रू असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा 2008 पासून करार आहे. त्यामुळे सगळे जग जरी कोरोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत. त्याची परतफेड नको?, असा खोचक सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

महामारीच्या वेळी काँग्रेसने ‘टूलकिट’ च्या माध्यमातून सरकारला घेराव घालण्यासाठी अनेक मार्गांनी देशात गोंधळ निर्माण करून राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी महामारीचा उपयोग पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला डागाळण्याची संधी म्हणून केला. कोरोनातील नव्या व्हायरसचे नाव मोदी व्हायरस ठेवण्याच्या सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. काँग्रेसने परदेशी पत्रकारांच्या मदतीने भारताची बदनामी करण्याचे कसलाही कसूर सोडली गेली नाही.

टूलकिट म्हणजे काय?

जगाच्या वेगवेगळ्या भागात सातत्याने आंदोलन होत असतात. मग ते अमेरिकेतील ब्लॅक लाइव्ह मॅटर असो वा लॉकडाउन विरोधी आंदोलन पर्यावरणाशी निगडित क्लॅमेट स्टाईक कॅम्पेन्ग असो किवा दुसरे कुठले आंदोलन. अशा स्वरूपाची आंदोलन करताना त्याचा एक कृती कार्यक्रम तयार केला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणे वा तीव्र करण्याच्या उद्देशाने हे तयार केले जाते. ज्यामध्ये हा कृती कार्यक्रम नोंदवण्यात येतो, त्याला टूलकिट असे म्हटले जाते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply