पेण : प्रतिनिधी
लोकशाहीच्या राज्यकारभारामध्ये निवडणूक हा महत्त्वाचा घटक आहे. दर पाच वर्षांनी होणार्या निवडणुकीत 18 वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार राष्ट्रीय कर्तव्य समजून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी या महोत्सवात सामील व्हावे आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पेण येथे केले. सहाय्यक निवडणूक अधिकारी व पेण विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सुमारे 2000 ते 2500 महिला उपस्थित होत्या. त्यांना डॉ. विजय सूर्यवंशी मार्गदर्शन करीत होते.
पेण तहसीलदार अरुणा जाधव, रोहा तहसीलदार कविता जाधव, पेण मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह पेण तहसीलचे सहाय्यक अधिकारी व कर्मचार्यांनी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उपस्थित महिलांना निवडणूक यंत्रणेबाबतची सर्व माहिती दिली. पेण नगर परिषदेने या कार्यक्रमाची व्यवस्था केली होती.
या वेळी उपायुक्त शिंदे, डीवायएसपी नितीन जाधव, पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, नायब तहसीलदार मोरेश्वर हाडके यांची उपस्थिती होती.