Breaking News

बाप्पा पावला! ई-पासमधील विघ्न दूर; चाकरमान्यांना मिळाला दिलासा

मुंबई ः प्रतिनिधी

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या चाकरमान्यांना खूशखबर मिळाली आहे. आता चाकरमान्यांच्या ई-पासमधील अडथळा दूर झाला आहे. कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी पास दिलाच पाहिजे, असे आदेशच सर्व पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच पोलिसांच्या संकतेस्थळावरही गणेशोत्सावासाठी ई-पासचा स्वतंत्र पर्याय देण्यात आल्याने कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना तत्काळ ई-पास मिळणार असून त्यांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुकर होणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना ई-पास मिळावा म्हणून मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक काढले असून त्यात संबंधित अधिकार्‍यांना तातडीने चाकरमान्यांना पास देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर गणेशोत्सवाचा पर्याय देण्यात येत आहे. सर्व पोलीस उपायुक्तांना पासला मंजुरी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी ई-पासला विनाविलंब मंजुरी देण्याचे निर्देश सर्व उपायुक्तांना देण्यात आले आहेत. केंद्र तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना प्रवासाचा पास देण्यात यावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

पोलिसांच्या संकेतस्थळावरून ई-पासची परवानगी देण्यात येते. त्यामुळे साइटवर गणेश फेस्टिव्हल असा एक नवा पर्याय देण्यात आला असून त्यामुळे चाकरमान्यांना या ऑप्शनवर जाऊन ई-पासची परवानगी घेता येणार आहे. पोलिसांच्या परिपत्रकात तसा उल्लेखही करण्यात आला आहे. चाकरमान्यांना पास देताना कोणत्याही प्रकारे उशीर होता कामा नये. ई-पास देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य देण्यावर अधिक भर देण्यात यावा आणि ई-पास देण्याबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे निर्देशही संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply