Breaking News

बांगलादेशकडून ओमानचा पराभव

अल अमिरात ः वृत्तसंस्था

टी-20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत बांगलादेशने ओमानला 26 धावांनी पराभूत करीत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. बांगलादेशने 20 षटकांत सर्वबाद 153 धावा केल्या होत्या, मात्र ओमानचा संघ 20 षटकांत नऊ गडी गमवून 127 धावा करू शकला. गट ‘ब’मध्ये स्कॉटलँड, ओमान, बांगलादेश आणि पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघ आहेत. स्कॉटलँडने सलग दोन सामने जिंकल्याने सुपर 12 फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. स्कॉटलँडची धावगती +0.575 इतकी असून गुणतालिकेत संघ अव्वल स्थानी आहे, तर ओमानला बांगलादेशकडून पराभव सहन करावा लागला असला तरी धावगती चांगली असल्याने दुसर्‍या स्थानी आहे. गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर बांगलादेशचा संघ आहे. स्कॉटलँडकडून मिळालेल्या पराभवानंतर आता धावगती राखण्याचे बांगलादेशसमोर आव्हान आहे. दुसरीकडे पीएनजीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.ओमानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशकडून मोहम्मन नईमने सर्वाधिक 50 चेंडूंत 64 धावा केल्या.  शाकिब अल हसनने 29 चेंडूंत 42 धावांची खेळी केली, तसेच चार षटकांत 28 धावा देत तीन गडी बाद केले. त्यालाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply