Breaking News

जेएनपीटीमुळे देशातील बंदर उद्योगास बळकटी

मे महिन्यात कंटेनर हाताळणीत झाली वाढ

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

जेएनपीटीने गेल्या काही महिन्यांत अनेक आव्हानांवर मात करीत माल हाताळणीत निरंतर वाढ सुरूच ठेवली आहे. गेल्या काही महिन्यांत जेएनपीटीने आयात-निर्यात समुदायासाठी व्यवसाय, कार्यक्षम, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व सुरळीत होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

जेएनपीटीने मे महिन्यात चार लाख 54 हजार 385 टीईयूची (कंटेनर मोजण्यासाठीचे वीस फूट समकक्ष युनिट) हाताळणी केली. मागील वर्षीच्या मे महिन्यातील दोन लाख 74 हजार 755 टीईयू तुलनेत 65.38 टक्के अधिक आहे. रेल्वे ऑपरेशन्सच्या बाबतीत जेएनपीटी बंदरात मे, 2021 मध्ये 551 रेल्वे रेकच्या माध्यमातून 86 हजार 452 टीईयू आयसीडी वाहतुकीची हाताळणी केली गेली. बंदराच्या माल वाहतुकीत रेल्वेचा हिस्सा 19.03 टक्के आहे.

कोविड-19 विरोधातील लढा मजबूत करण्यासाठी जेएनपीटीने मे महिन्यात 327,632 मे.टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांची यशस्वीरित्या हाताळणी केली. जेएनपीटी वैद्यकीय ऑक्सिजन घेवून येणार्‍या जहाजांची विना अडथळा वाहतूक सुनिश्चित करीत असून अशा प्रकारच्या सामग्रीच्या हाताळणीस प्राधान्य देत आहे. कोरोना उपचारासाठी आवश्यक ऑक्सीजन व इतर वैद्यकीय सामग्री रूग्णालयांना वितरित करण्यासाठी जेएनपीटीने आतापर्यंत एकूण 278.272 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन आणि 49.36 मे.टन वैद्यकीय उपकरणांची हाताळणी केली आहे.

10 मे रोजी, आम्ही संयुक्त अरब अमिरातीहुन एएक्सएस सर्विसच्या एमव्ही जीएसएफ गिझेल या जहाजातुन आलेले व क्रायोजेनिक स्वरूपातील 80 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन असलेले चार कंटेनर बंदरात उतरविण्यात आले. 15 मे रोजी कुवेतच्या जिबेल अलीहुन ’एमव्ही नागोया टॉवर’ जहाजातून आलेल्या 150.23 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन असलेले कंटेनर बंदरात उतरविण्यात आले.

18 मे रोजी अरबी समुद्रात शक्तिशाली तौक्ते चक्रीवादळ असतानाही जेएनपीटीने संयुक्त अरब अमिरातीहुन आलेला 28.72 मे.टन वैद्यकीय ऑक्सिजन यशस्वीरित्या बंदरात उतरविला व तो त्वरित निर्गमित केला. 21 मे रोजी यूएईहून 19.32 मे. टन वैद्यकीय ऑक्सिजन घेवून आलेल्या ’एमव्ही लेबू’ जहाजाची हाताळणी केली. त्याचबरोबर 28 मे रोजी एमिरेट्स शिपिंग एजन्सीज इंडिया प्रा. लि. द्वारा चीनच्या निंगबो येथून 2448 रिकामे ऑक्सिजन सिलिंडरसह इतर वैद्यकीय उपकरणे  (एकूण वजन 49.36 मे.टन) असलेले 3 कंटेनर जेएनपीटी बंदरात उतरविण्यात आले.

मे महिन्यात सुद्धा चांगली कामगिरी केली असून देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करीत असलेल्या कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेवर मात करण्याच्या प्रयत्नात आम्ही आमचे योगदान देत राहणार आहे. आम्ही ऑक्सिजन कंटेनर आणि इतर वैद्यकीय उपकरणांच्या हाताळणीस प्राधान्य देत असून देशाला या संकटावर मात करण्यासाठी मदत करीत आहोत, असे जेएनपीटीचे अध्यक्ष यांनी जेएनपीटीच्या कामगिरीवर म्हटले आहे.

-संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply