Breaking News

गरजू कलाकार, रिक्षाचालकांना धान्यवाटप

भाजप नेते बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : वार्ताहर

कोकण म्हाडाचे माजी सभापती तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील हे नेहमीच आपला वाढदिवस समाज हेच आपल कुटुंब असे मानून विविध सामाजिक उपक्रम करून साजरा करत असतात. म्हणूनच गोरगरीब जनतेला आपलासा वाटणारा आणि नागरिकांसाठी प्रामाणिकपणे अहोरात्र झटणारा नेता म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे. सध्या कोरोना काळात एकूणच अनेकांची बिघडलेली आर्थिक घडी लक्षात घेता त्यांचा हा वाढदिवस बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू कलाकार, रिक्षा चालकांना मदत करून साजरा करण्यात आला.

या वेळी गरजू रिक्षा चालकांना मोफत सीएनजी कूपनचे वाटप केले गेले, तसेच रंगभूमीच्या गरजू कलाकार बांधवांना मोफत धान्य किट दिले गेले. याच कार्यक्रमांतर्गत कोरोना संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या डॉकटर्स, नर्स, फार्मासिस्ट, टेक्निशियन व काही होतकरू तरुणांचा कोविड योद्धा म्हणून विशेष सन्मान आणि सत्कार करण्यात आला. हा मदत उपक्रम माजी उपमहापौर तथा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाजवळ साकारण्यात आला.

या उपक्रमाचे सर्वच उपस्थितांनी आणि लाभार्थ्यांनी कौतुक केले व आभार केले. अनेकांनी बाळासाहेब पाटील यांच्या सोबतचे जुने आठवणीतील किस्से सांगितले आणि बाळासाहेबांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले. या वेळी भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, युवा मोर्चा माजी जिल्हा सरचिटणीस समीर कदम, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत कदम, देविदास खेडकर, उदय पाटील, भीमराव गेंड, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply