धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील राजमुद्रा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी राजेश डाके आणि सचिवपदी श्रीकांत दरडे यांची निवड करण्यात आली. संस्थेची विशेष बैठक नुकतीच संस्थेचे संस्थापक अमित घाग याच्या उपस्थितीत धाटाव एमआयडीसीमधील मंदिरात झाली. या बैठकीत संस्थेची नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली.
फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक कार्यकर्त्यांना लोकसेवा करण्याची संधी मिळावी, या हेतूने संस्थेची जम्बो कार्यकारीणी निवडण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात संस्थेचे काम घराघरात पोहचण्यात फाऊंडेशनचे सर्व सदस्य यशस्वी होतील, असे मत संस्थापक अमित घाग यांनी या वेळी व्यक्त केले.
राजमुद्रा फाऊंडेशनच्या नवीन कार्यकारी मंडळामध्ये अमोल घाग, जितेंद्र जाधव, प्रितेश वारंगे (उपाध्यक्ष), अरूण पडवळ (सहसचिव), विलास डाके (संघटक), अमोल गंधाले (सहसंघटक), अमर वारंगे (कोषाध्यक्ष), सुबोध पाटील (संपर्क प्रमुख), रितेश घाग (सहसंपर्क प्रमुख), सनिल इंगावले (प्रसिद्धी प्रमुख), पूजा कुंडे, नवनित ठाकूर (सोशल मीडिया) यांचा समावेश आहे. सल्लागार म्हणून विरेंद्र वारंगे, सचिन मोरे, गुणाजी घाग, तुकाराम वारंगे, रवी ठाकूर, प्रवीण घायले, राजेश राऊत, महेश मोरे तर कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. दिनेश वर्मा, अॅड. जगदीश तांबुटकर यांची निवड करण्यात आली.
अक्षय वारंगे, ओमकार घाग, दिपेश ठाकूर, ओंकार खैरे, राहूल डाके, रोहित यादव, आर्यन म्हात्रे, श्रद्धा कुंडे, प्रतीक्षा घाग, साहिल जोंधळे, मयुर डाके, शिवाजी दीवकर, सागर डाके, विक्रांत वारंगे यांची फाऊंडेशनच्या विविध विभागाच्या प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या वेळी रोहिणी गोसावी यांंचा विशेष सत्कार करण्यात आला.