Breaking News

इंग्लंडची पाकिस्तानविरुद्ध विजयी सलामी

कार्डिफ ः वृत्तसंस्था
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या अननुभवी संघाने पाकिस्तान संघाची दाणादाण उडाली. या सामन्याआधी इंग्लंडच्या संघातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला अचानक संघ बदलावा लागला. सामन्यात इंग्लंडकडून खेळणार्‍या अनेक खेळाडूंकडे अनुभव नव्हता. तरीदेखील त्यांनी पाकला सहज गारद केले.
इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखाली मुख्य संघ आयसोलेशनमध्ये केल्याने बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध लढत होता. या सामन्यात पाकिस्तान वरचढ ठरले असे वाटले होते, पण प्रत्यक्षात वेगळेच घडले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानची अशी काही दाणादाण उडवली की त्यांना 35.2 षटकांत फक्त 141 धावा करता आल्या. इंग्लंडने पहिल्या षटकाच्या तीन चेंडूंवर 2 बाद शून्य अशा पाकची अवस्था केली होती. पाकिस्तानकडून फखर जमाने 67 चेंडूंत सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याने डाव संभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अन्य कोणाची साथ मिळाली नाही. इंग्लंडकडून जलद गोलंदाज साकीब महमूदने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
विजयाचे लक्ष्य इंग्लंडने 21.5 षटकांत फक्त एक विकेट राखून पार केले. इंग्लंडच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला हा सर्वांत मोठा विजय ठरला. इंग्लंडकडून सलामीवीर डेव्हिड मलानने नाबाद 68 आणि जॅक क्राऊलीने 58 धावा केल्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply