मुंबई-पुणे महामार्गावर कारला अपघात

पाच जण गंभीर जखमी

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावर माडप बोगद्याजवळ, पुणे दिशेच्या लेनवर पुढे जाणार्‍या टँकरला मागून सीलेरिया कारने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले. जखमीत एका महिलेचा समावेश आहे. सर्व जखमींना लोकमान्य पुणे येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबईहून पुणेकडे एमएच 02-8487 सीलेरिया कार जात असताना, खालापूर तालुका हद्दीत कारने पुढे जाणार्‍या आर जे 25 जीए 2911 या क्रमांकाच्या टँकरला मागून जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात होऊन यात राजेंद्र माणिक (56, लोकमान्य नगर ठाणे), वर्गीस प्रकाश (30, ठाणे), शुभम सिंग (24, भोसरी पुणे), मुकेंद्र सुतार (27, कणकवली, सिंधुदुर्ग) हे प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना लोकमान्य पुणे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एक महिला प्रवासी आहे, पण त्यांचे नाव अद्याप समजले नाही. सर्व प्रवासी शेअरिंग पद्धतीने मुंबईहून पुण्याला प्रवास करीत होते. या घटनेबाबत खालापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास सुरू आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल

युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अ‍ॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा …

Leave a Reply