Breaking News

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव 20 व 21 डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये झाला. या महोत्सवातील खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. म्हात्रे, श्री. आघाव, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, रामशेठ ठाकूर कॉलेजचे उपप्राचार्य शहा, क्रीडा शिक्षक अजिंक्य भगत यांच्या उपस्थितीत झाले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या क्रीडा महोत्सवात कॅरम, चेस, कुस्ती या इनडोअर आणि क्रिकेट, हॅण्डबॉल, फुटबॉल, डॉजबॉल, गोळाफेक या आऊटडोअर खेळांचा समावेश होता. दुसर्‍या दिवशी महोत्सवाची सांगता झाली. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कार्यकारिणी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांनी क्रीडा महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply