Breaking News

युनायटेड ब्रेव्हरीज कंपनीकडून पनवेल महापालिकेला रुग्णवाहिका

पनवेल : प्रतिनिधी

तळोजा येथील युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेड या कंपनीने पनवेल महानगरपालिकेस शुक्रवारी (दि. 16) एक रुग्णवाहिका भेट दिली. ’बेसीक लाईफ सपोर्ट कार्डियाक’ ही रुग्णवाहिका कंपनीच्या 2021-22च्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) देण्यात आली आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

युनायटेड ब्रेव्हरीज यांच्याकडून महापालिकेस मिळालेल्या रुग्णवाहिकेचा पालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांसाठी मोठा उपयोग होणार आहे. पनवेल महापलिका क्षेत्रातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नातून कळंबोली येथे कोविड समर्पित रूग्णालय सुरू करण्यात आले आहे.

या रुग्णालयात तसेच उपजिल्हा रुग्णालय, कोन येथील इंडिया बुल्स विलगीकरण केंद्र याठिकाणी महापालिका कार्यक्षेत्रातील सहा नोडमधील रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांना ने-आण करण्यासाठी सध्या पालिकेकेडे एकुण 22 रुग्णवाहिका आहेत. यातील 17 रुग्णवाहिका या भाडेतत्वावर आहेत. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी आणि वैद्यकिय अधिकारी डॉ. पूनम जाधव यांच्या प्रयत्नातून तळोजा येथील युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेड या कंपनीने महानगरपालिकेस रुग्णवाहिका दिली.

या वेळी नगरसेवक बबन मुकादम, हरेश केणी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेडचे माणिक चोप्रा, अमृत अम्बूलकर, अविनाश रणनवरे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply