Breaking News

पोलीस दलातील 933 जण कोरोनाबाधित; नऊ जणांचा मृत्यू; कमी मनुष्यबळात काम

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई, पनवेल व उरणमध्ये आतापर्यंत 933 पोलीस कर्मचारी, अधिकारी कोरोनाबाधित झाले असून त्यातील नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे यातील 834 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण पाहता प्रत्येक पोलीस ठाण्यातील 30 ते 35 जण बाधित आहेत. अशा परिस्थितीतही कमी मनुष्यबळात ते काम करीत आहेत. 933 कोरोनाबाधित पोलिसांमधील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यात 41 ते 55 या वयोगटातील आठ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 51 ते 55 वयोगटातील चार व  41 ते 50 या वयोगटातील चौघांचा समावेश आहे. बाधितांमध्ये 813 पोलीस कर्मचारी तर 111 पोलीस अधिकारी आहेत. यामध्ये 31 ते 40 या वयोगटातील 319 पोलीस कर्मचारी व 46 पोलीस अधिकारी बाधित आहेत. 56 ते 60 वयोगटातील 205 कर्मचारी व 35 अधिकारी बाधित झाले आहेत. मात्र त्यापैकी कोणाचाही मृत्यू उपचारादरम्यान झाला नाही.   सध्या 99 पोलीस कोरोनाबाधित आहेत. रस्त्यावर नागरिकांशी वारंवार येणार्‍या संपर्कामुळे बाधितांचे प्रमाण वाढत असल्याचे वेलनेस पथकातील अधिकारी सांगत आहेत.

तरुणांमध्ये प्रमाण कमी

तरुणांची प्रतिकारशक्ती अधिक चांगली असल्याने 20 ते 30 वयोगटातील पोलिसांचे बाधितांमध्ये कमी प्रमाण आहे. आतापर्यंत 117 जण या वयोगटातील पोलीस कोरोनाबाधित असून, एकही जणाचा मृत्यू झाला नाही.

अंमलबजावणी कठीण

नवी मुंबई पोलीस दलात 55 वर्षांवरील पोलिसांची संख्या मोठी आहे. नव्या आदेशानुसार घरून काम केल्यास अनेक पोलीस ठाण्याचा कारभाराची खांदेपालट करावा लागेल. पोलीस सहआयमुक्तांसह आयुक्तांना यापुढे घरातूनच काम करावे लागेल.

पोलीस दलातील कोरोनाचा नववा बळी

पनवेल : नवी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांतिलाल कोळी (55) यांचा रविवारी डी. वाय. पाटील रुग्णालयात कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कोळी हे सीबीडी बेलापूर येथील पोलीस वसाहतीमध्ये राहत होते. सध्या ते एनआरआय पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 15 सप्टेंबरपासून त्यांना कोरोनाची लक्षण दिसू लागल्याने डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. नवी मुंबई पोलीस दलातील 950 जणांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply