पनवेल : रामप्रहर वृत्त
सबका साथ, सबका विकास यासोबत सबका प्रयास या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठू शकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात द्वारे देशवासीयांशी संवाद साधता वेळी केला. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात द्वारे देशवसीयांशी संवाद साधतात. त्याअंतर्गत पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि के. गो. लीमये वाचनालय येथे मन की बातच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात च्या माध्यामातून देशवासीयांशी संवाद साधला. मन की बातच्या 80 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पक स्पर्धा, स्टार्ट अप, भारतीय संस्कृतीवर या सारख्या विविध विषयांवर चर्चा केली. तसेच क्रीडा दिनानिमित्त त्यांनी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजलीही वाहिली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे आयोजीत करण्यात आलेल्या मन की बात च्या थेट प्रक्षेपणावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, युवामोर्चाचे चिन्मय समेळ, तसेच के. गो. लीमये वाचनालय येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदु पटवर्धन, नगरसेविका रूचिता लोंढे, गुरुनाथ लोंढे, सांस्कृतीक सेलचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी, बुथ कार्यकर्ते उपस्थित होते.