Breaking News

‘सीकेटी’त महिला सक्षमीकरण आणि मुक्ती विषयावर आभासी व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त

आंतरराष्ट्रीय कन्या दिन तसेच जागतिक विद्यार्थी दिवस (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती) चे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे 18 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता महिला सक्षमीकरण आणि मुक्ती या  विषयावर आभासी माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले.

प्रस्तुत कार्यक्रमास बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स, ठाणे येथील प्राणीशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. विंदा मांजरमकर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस. के. पाटील यांनी प्रमुख वक्त्या डॉ. विंदा मांजरमकर यांचे स्वागत केले आणि उपस्थितांना संबोधित करीत असताना महाविद्यालयाच्या सुवर्णमय कामगिरींचा मागोवा घेतला व तसेच महाविद्यालयामध्ये मुलींची संख्या जास्त असून मुली शिक्षण क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करत आहेत असे सांगितले.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा.सुर्यकांत परकाळे ह्यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. परकाळे यांनी आपल्या प्रस्तावने मध्ये स्त्री पुरुष सामानता बद्दल आपले विचार मांडून आपल्या भारतातील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्त्री मुक्ती साठी लढलेल्या महिलांचा उल्लेख केला. तसेच त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विद्यार्थ्यांमधील लोकप्रियतेबद्दल ही सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. विंदा मांजरमकर यांचा परिचय दिला. उपस्थितांसोबत संवाद साधत असताना डॉ. विंदा यांनी भारतात होऊन गेलेल्या रणरागिणींची माहिती दिली. तसेच सध्याची महिलांची परिस्थिती मांडून महिला सशक्तीकरण आणि मुक्ती याचा खरा अर्थ काय होतो हे उत्तमरीत्या उपस्थितांना सांगितले.  परोपकार घरापासून सुरू होतो असे सांगत आपण आपल्या पिढीला महिलांबद्दल आदर करण्याचे तसेच कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता राखण्याचे आवाहन  केले.  

सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाद्वारे करण्यात आले त्यामध्ये विशेषकरून राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यकारी अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव प्रा. आकाश पाटील व प्रा. अपूर्वा ढगे ह्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. बी डी. आघाव, कला विभागाचे प्राध्यापक प्रमुख डॉ. बी. एस. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. अपूर्वा  ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. सत्यजित कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply