Breaking News

पीर करमअली शहा बाबांना 70 फूट फुलांची चादर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेलकरांचा अभिमान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शहरातील पीर करमअली शहा बाबांच्या दर्ग्यात राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे गुरुवारी (दि. 18) 70 फूट फुलांची चादर अर्पण करण्यात येणार आहे. 

2 जून रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पीर करमअली शहा बाबांच्या दर्ग्यात 70 फूट फुलांची चादर अर्पण करण्यात येणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त 70 सामाजिक कार्यक्रम राबवून त्यांना अनोख्या शुभेच्छा देण्याचा संकल्प महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी केला आहे. गुरुवारच्या कार्यक्रमास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply