Breaking News

राजू शेट्टी यांचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

कोल्हापूर : प्रतिनिधी
पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (दि. 5) नृसिंहवाडीत जलसमाधी आंदोलन केले. या वेळी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीपात्रात उड्या मारल्या. त्यांना पोलिसांनी बोटींच्या सहायाने तातडीने बाहेर काढले. शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केल्यानंतर बुधवारी ही पदयात्रा नृसिंहवाडीत दाखल झाली. या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेट्टी व कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण आहे. पूरग्रस्तांसंदर्भात सोमवारी दुपार 3 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply