Breaking News

सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये

कळंबोली : सबका साथ सबका विकास या ध्येयाने कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचा ओघ सातत्याने वाढत असून, कळंबोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 21) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सामाजिक बळ मिळाले आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमास नगरसेवक अमर पाटील, भाजप शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, तालुका उपाध्यक्ष रवींद्र बन्सल, सचिव आशिष मोटे, युवा मोर्चा अध्यक्ष अमर ठाकूर, तालुका उपाध्यक्ष जमिर शेख, युवा नेता हॅप्पी सिंग, केशव यादव, संजय दिंडके, बबन बारगजे, राजन पिळे, विनायक कोळी, सिदू शर्मा, निशांत गिल, रखत सिंग, मनंदराज सिंग, सतनात सिंग आदी उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply