कोलंबो : जगभरात रविवारी (दि. 21) ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेची राजधानी कोलंबोत चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये सुमारे 207 जणांचा मृत्यू; तर 450हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश अधिक असून, त्यातील 35 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन जण भारतीय आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या आठ साखळी स्फोटांनंतर श्रीलंका सरकारने देशात संचारबंदीचे आदेश दिले आहेत; तर भारतातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …