Breaking News

सागमळा येथे मोफत योग शिबिरास प्रतिसाद

रेवदंडा : प्रतिनिधी

पंतजली योग समिती तर्फे योग स्वामीजी रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली सागमळा येथील पाठारे क्षत्रीय समाज सभागृहात सात दिवसांचे मोफत योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चौल पाचकळशी समाज अध्यक्ष सुरेश घरत-कोटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून शनिवारी सकाळी या योग शिबिरास सुरूवात झाली. यावेळी पंतजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी अर्चनाताई सुर्वे, योगपीठ ट्रस्टच्या शुभांगी दिलिप घरत उपस्थित होते. या शिबिरात योगासने, अ‍ॅक्युप्रेशर, मुद्रा व आयुर्वेद आदींची माहिती देण्यात येणार आहे. या मोफत योग शिबिराचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चौल पाचकळशी समाज अध्यक्ष सुरेश घरत कोटकर यांनी केले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply