नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील या महत्त्वपूर्ण निवडणुकीचा बिगूल कधी वाजणार याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. राजकीय पक्षदेखील निवडणुकीच्या तयारीला लागलेत. सर्वांच्या प्रतीक्षेला पुढील आठवड्यात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून यंदा लोकसभा निवडणूक ही सात ते आठ टप्प्यांमध्ये घेतली जाऊ शकते. निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांत होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत राज्यातील निवडणूक आयोगांना पत्रदेखील पाठवले आहे. ज्यामध्ये 2014 निवडणुकीच्या तुलनांमध्ये काही बदल करणे अपेक्षित असेल; तर तशा सूचना मागवण्यात येत आहेत. लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या वेळेत बदल करण्याची आवश्यकता वाटत असल्यास त्याबाबत कळवावे, असे या पत्रात नमूद केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तयारीला अंतिम रूप देण्याच्या तयारीला लागले आहे. त्या दृष्टीने राज्यातील निवडणूक कार्यालयांकडून आढावा घेण्यात आलेला आहे. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. आयोगाच्या सूत्रांनुसार सर्व तयारी पार पडल्यानंतर 17व्या लोकसभा निवडणुकीसाठीची घोषणा केली जाणार आहे.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper