मॅके (ऑस्ट्रेलिया) ः वृत्तसंस्था
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मॅकेच्या हारुप पार्क मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार मिताली राजने 61 धावांची खेळी खेळली. या खेळादरम्यान मितालीने तिच्या कारकिर्दीतील 20 हजार धावांचा टप्पा पार केला. याचबरोबर मितालीचे एकदिवसीय सामन्यातील हे सलग पाचवे अर्धशतक आहे. मितालीने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग चार अर्धशतके केली होती आणि या मालिकेच्या पहिल्या सामन्यातही मितालीने अर्धशतक केले आहे.