Breaking News

नवी मुंबईतील आठ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नवी मुंबई पोलीस दलातील 11 पोलीस निरीक्षकांच्या शुक्रवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. आता शनिवारी (दि. 31) आणखी आठ अधिकार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी जारी केले आहेत. संबंधित अधिकार्‍यांना नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे सूचित करण्यात आले आहे.

गुन्हे अन्वेषणामध्ये हातखंडा असलेले त्याचबरोबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे अधिकारी म्हणून ज्यांचा पोलीस दलात दबदबा आहे असे पोलीस निरीक्षक गिरधर गोरे यांची गुन्हे शाखेचे कक्ष क्रमांक 2चे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोंडीराम पोपेरे यांच्या निवृत्तीनंतर ही जागा रिक्त झाली होती. या कक्षाची अतिरिक्त जबाबदारी पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याकडे होती.

ज्या नावाने गुन्हेगारांचा थरकाप उडतो असे गोरे हे कक्ष क्रमांक 2चे प्रमुख म्हणून काम करणार आहेत. कळंबोली परिसरातील वाहतुकीला शिस्त लावणारे अंकुश खेडकर यांचीही पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्या ठिकाणी नियुक्तीस असलेले सतीश जाधव हे विशेष शाखेत काम करतील. उरण पोलीस ठाण्यातील अतुल आहेर यांची एपीएमसी वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्याकडे गुन्हे कक्ष क्रमांक 1ची जबाबदारी असेल. कळंबोली वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारीपदी निशिकांत विश्वकार यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते याअगोदर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. कामोठे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांची खारघर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सुभाष निकम हे गुन्हे शाखेतील प्रशासनात यापुढे काम करतील.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply