Breaking News

पेणमध्ये सायकल रॅली

पेण : प्रतिनिधी

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पेण नगर परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात सायकल रॅली काढण्यात आली होती. प्रदूषण रोखण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी सायकलचा वापर करा आणि शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी या वेळी केले. पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी नगर परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पेण शहरामध्ये सायकल रॅली काढण्यात आली होती. रॅलीत पत्रके वाटून नगर परिषद कर्मचार्‍यांनी नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व सांगितले आणि जनजागृतीदेखील केली. तसेच फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरण संरक्षणासाठी मदत करा, असे आवाहन केले. नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, सभापती अ‍ॅड. तेजस्विनी नेने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, प्रशासकीय अधिकारी राजाराम नरुटे, आरोग्य अधिकारी अंकिता इसाळ, शिवाजी चव्हाण, किरण शहा, उमंग कदम, सचिन शिगवण, मिलिंद बोचरे, राधा मनोरे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकार व सदस्य तसेच नागरिक या सायकल रॅलीत सहभागी झाले होते.

शहरातील पर्यावरणाचे संतुलन राखण्याची गरज लक्षात घेता नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपले आणि इतरांचे आरोग्य निरोगी राहील.

-प्रीतम पाटील, नगराध्यक्षा, पेण

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply