Breaking News

‘गृहरक्षक दलाच्या सर्वच जवानांना 108 रुग्णवाहिकेची माहिती असायलाच पाहिजे’

अलिबाग : रामप्रहर वृत्त

अपघातस्थळी तातडीने पोचून जखमींना रुग्णालयापर्यंत पोचविण्याचे काम 108 ही रुग्णवाहिका करीत असल्याने या रुग्णवाहिकेबाबतची माहिती गृहरक्षक दलाच्या सर्वच जवानांना असायला पाहिजे, असे मत आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी व्यक्त केले. रायगड जिल्हा होमगार्ड व नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग गोंधळपाडा येथील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पाटील मार्गदर्शन करीत होते. अपघात झाल्याचे लक्षात येताच 108 या क्रमांकावर रिंग केल्यास काही मिनिटातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोचू शकते, असे सांगून पाटील यांनी या रुग्णवाहिकेबाबतची सविस्तर माहिती दिली. मोबाइल ही गरजेची वस्तू असली, तरी त्याचा वापर जपून करायला पाहिजे. आपल्या मोबाईलचा वापर त्रयस्त व्यक्तीला करायला देऊ नये तसेच घरातील स्वयंपाकाचा गॅस, पिण्याचे पाणी, फ्रिज किंवा आपल्या जवळील कोणतेही वाहन यांचा व्यवस्थितपणे वापर केला नाही तर आपल्यावर आपत्ती ओढवू शकते, असेही पाटील यांनी सांगितले. रुग्णवाहिकेतील डॉ. पांडे व स्वप्निल पाटील यांनीही प्रशिक्षणार्थिंना मार्गदर्शन केले. आपण स्वत:हून गृहरक्षक दलात आल्याने आपल्या वाट्याला आलेले कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि कोणतेही कारण न देता करायला पाहिजे. आपल्यामुळे कोणतेही काम अडणार नाही, याकडे जवानांनी पहायला पाहिजे, असे अतुल झेंडे म्हणाले. गृहरक्षक दलाचे केंद्र नायक सचिन गावडे यांनी आभार मानले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply