पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 4) सकाळी 6 वाजता खारघरमध्ये गाण्यांची सुरेल मैफल म्हणजेच दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खारघर सेक्टर 12मधील ग्रीन फिंगर शाळेजवळील गावदेवी मैदानात हा कार्यक्रम होणार असून यात प्रीती निमकर-जोशी, अनिरुद्ध भिडे, आदिती प्रभुदेसाई, प्रणय पवार मैफल सादर करतील. यासाठी प्रवेश निःशुल्क असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …