Breaking News

ब्रेक फेल झाल्याने ट्रक 20 फुट दरीत कोसळला

एक ठार, एक जखमी; काही काळ वाहतूक ठप्प

खालापूर ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट 20 फूट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचालकाने उडी मारल्याने तो बचावला असला, तरी गंभीर जखमी झाला आहे, तर क्लिनर ट्रकमध्येच अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.
ट्रकचालक श्रीमंत नवणे (वय 46, रा. उमनाबाद जि. बिदर कर्नाटक)हा कर्नाटक ते अंबरनाथ असा घेऊन जात असताना खोपोली एक्झिटदरम्यान ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. प्रथम चालकाने ट्रकमधून खाली उडी मारली. ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंग तोडून, सिमेंट भिंतीला जोरात धडक मारून बाजूला असलेल्या 20 फूट दरीत पलटी झाला. चालक याने ट्रकमधून खाली उडी मारल्याने त्याच्या कंबरेला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तसेच क्लिनर ट्रकमध्ये अडकल्याने जागीच ठार झाला.
या घटनेने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग बोरघाट पोलीस उपनिरीक्षक गजानन म्हात्रे यांनी वाहतूक कोंडी दूर करून जखमींला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
*फोटो खालापूर अपघात

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply