मुंबई ः राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती तसेच रुग्णालयांतील बेड, इंजेक्शन व ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 12) मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान राज्य सरकारला धारेवर धरले. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘स्वत:च स्वत:च्या कौतुकाची टिमकी वाजवत त्यातच मश्गूल असणार्या राज्य सरकारचे वाभाडे आज न्यायालयाने काढले. जनहितापेक्षा स्वकौतुकासह बेछूट व बेजबाबदार विधान करण्याची सवय असलेल्या राज्य सरकारने तिथेही न्यायालयाची दिशाभूल करीत वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला, पण थेट फोनच लावायला सांगत तोही उघडा पडला. या खरडपट्टीनंतर राज्य सरकार भानावर येऊन काही जनहिताचे निर्णय घेईल का? हा खरा प्रश्न आहे,’ असे भाजप प्रवक्ते उपाध्ये यांनी म्हटले आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …