Breaking News

न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर विजय, भारताचे आव्हान संपुष्टात

आबूधाबी : वृत्तसंस्था
ट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठीचा चौथा संघ निश्चित झाला आहे. अफगाणिस्तानवर मात करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. न्यूझीलंडच्या या विजयासह भारताचे ट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत आव्हान देखील आता संपुष्टात आले आहे. अबूधाबीच्या स्टेडियमवर झालेल्या रविवारच्या (दि. 7) सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने 8 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन विजयाचा शिल्पकार ठरला. संघाची सलामीची जोडी तंबूत दाखल झालेली असताना विल्यमसन याने मैदानात जम बसवत संघाला विजय प्राप्त करून दिला. विल्यमसनने 42 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी साकारली, तर कॉनवेने 32 चेंडूत नाबाद 36 धावांची खेळी साकारली. मार्टिन गप्टिल (28) आणि मिशेल (17) यांना बाद करण्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना यश आले. अफगाणिस्तानने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, पण न्यूझीलंडच्या टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडले. 20 षटकांच्या अखेरीस अफगाणिस्तानला 8 बाद 124 धावाच करता आल्या होत्या. यातही नजीबुल्लाह जादरान यानं 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply