Breaking News

गुळसुंदे हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा

रसायनी : रामप्रहर वृत्त : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील तुंगारतन विभाग विद्यामंदिरात नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांच्यात विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान दिनानिमित्त वांद्रे (मुंबई) येथील अध्ययन संस्थेमार्फत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

अध्ययन संस्थेचे अध्यक्ष राजीव वर्तक व त्यांच्या सहकारी श्रीमती पेडणेकर यांनी विज्ञानातील विविध संकल्पनांवर संवाद साधला, तसेच ‘असे शोध.. असे शास्त्रज्ञ’ या अंतर्गत माहिती देताना वर्तक यांनी नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ व त्यांच्या शोधकथा सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. विद्यार्थ्यांनीदेखील विविध विज्ञान कोडी व प्रयोग करून राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा केला.

 या व्याख्यानाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आर. डी. पाटील व संपूर्ण समितीमार्फत प्रोत्साहन

मिळाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. पी. सुतार व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply