
उरण : रामप्रहर वृत्त
मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा या करिता जय मातादी ग्रुप दिघोडे तर्फे दिघोडे वासियांकरिता रांगोळी व गड किल्ले स्पर्धेचे आयोजन मयूर घरत व निलेश पाटील यांनी केले होते. नुकताच या
स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जाऊन करण्यात आला.
या मध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 5555 रुपये व चषकाचा शुभम कोळी हा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांक 2000 रुपये व चषकाचा रिद्धी पांडूरंग कोळी हा मानकरी ठरला, तर तृतीय क्रमांक 1000 रुपये व चषक चेतन पाटील याने पटकावला. गड किल्ले स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 5555 रुपये व चषकाचा मानकरी आखिल गणेश पाटील हा ठरला. द्वितीय क्रमांक 2000 रुपये व चषकाचा मानकरी जाणता राजा ग्रुप हा ठरला. तर तृतीय क्रमांक 1000 रुपये व चषक सिद्धी पांडूरंग कोळी हिने पटकावले तर सार्थक अशोक कोळी, सुमीत घरत, प्रतिक्षा पाटील, पद्माकर पाटील, प्रणाली पाटील, सार्थक वाणी, विनंती ढवळे, आदिना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून ग्रामपंचायत सदस्य शरद कोळी, रोहन म्हात्रे, अभिजित पाटील यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिघोडे गावच्या सरपंच सोनिया मयूर घरत, आश्विन पाटील, मयूर माळी, राकेश म्हात्रे, भावेश म्हात्रे, राजकुमार म्हात्रे. आदी सह जयमातादी ग्रुपच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमामुळे दिघोडे गावात आनंदाचे वातावरण पसरले असुन या स्पर्धेच्या माध्यमातून गावातील कलाकार ग्रामस्थांना पहायला मिळाले.