Breaking News

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील पद्म पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (दि. 8) राजधानी दिल्लीत झाला. यंदा सात मान्यवरांचा ‘पद्मविभूषण’, 10 मान्यवरांचा ‘पद्मभूषण’ आणि 102 जणांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारासहीत गौरव करण्यात आला आहे. तर 16 जणांना मरणोत्तर ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची मुलगी बान्सुरी स्वराज यांनी आपल्या आईच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण पार पडले.

देशातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘पद्मविभूषण’ प्राप्त मान्यवरांत दीर्घकाळापर्यंत जपानचे पंतप्रधान पद भूषणवणारे शिंजो आबे यांचाही समावेश आहे.

पार्श्वगायक एस. पी. बालासुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण, तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) आणि माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या कार्यकाळात भारत-जपान संबंधांत बरीच प्रगती झाली. सार्वजनिक सेवेसाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय.

गायक एस. पी. बालासुब्रमण्यम यांना कलाक्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालासुब्रमण्यम यांची तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये हजारो गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेय.

ओडिशाचे प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन साहू यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कलाकृतींची जगभरात चर्चा आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रख्यात भारतीय-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ नरिंदर सिंग कपानी यांना फायबर ऑप्टिक्स क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय. याचसोबत, कर्नाटकचे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ बेल्ले मोनाप्पा हेगडे, भारतीय इस्लामिक विद्वान आणि कार्यकर्ते मौलाना वहिदुद्दीन खान, पुरातत्त्वशास्त्रज्ञ बीबी लाल यांनाही पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply