Breaking News

वासांबे मोहोपाड्यात 62 कोरोनाबाधित

मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रसायनी परिसरातील  वासांबे मोहोपाडा हद्दीतही कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परिसरात चार दिवसांचा जनता कर्फ्यूही झाला. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीतील महेशवरी पार्क वसाहतीत दोघांचे, तर रिसवाडीतही दोघा पती-पत्नीचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीतील एकूण 62 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 22 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेऊन कोरोनाला हद्दपार करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply