मुरूड : प्रतिनिधी
शहरातील एसटी डेपोजवळील नितिन आबुर्लेच्या यांच्या घराच्या प्रांगणात कामगार नरेंद्र माने यांना अजगर आढळला. त्यांनी तात्कळ सर्पमित्र संदिप घरत यांना बोलविले. त्यांनी वन कर्मचार्यांच्या मदतीने 12 फूट लांबीच्या आणि 25 किलो वजनाच्या या सुस्त अजगराला पकडले. व वन विभागाच्या स्वाधीन करून अजगराला गारंबी येथील जंगलात सोडण्यात आले.
या अजगराला पकडण्यासाठी सर्पमित्र संदिप घरत, वनपरिक्षेत्रपाल प्रशांत पाटील, वनपाल किरण जाधव, रोहित विरुकुड, उमेश चौलकर, कल्पेश वाघमारे, अमित वाघमारे, सुरेश वाघमारे आदिंनी प्रयत्न केले.