Breaking News

भाजपकडून पाले येथील शाळेला इन्व्हर्टर

उरण : वार्ताहर

भारतीय जनता पक्ष उरण पूर्व विभागातर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या पाले येथील शाळेला इन्व्हर्टर प्रदान करण्यात आले.

उरण तालुका महिला अध्यक्ष राणी सुरज म्हात्रे, पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे  यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद, पाले शाळेला इन्व्हर्टर देण्यात आले.

या वेळी भाजप उरण तालुका महिला अध्यक्ष राणी सुरज म्हात्रे, पंचायत समिती अध्यक्ष प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे, पाले गाव अध्यक्ष अमित म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, युवा अध्यक्ष प्रदीप म्हात्रे, युवा उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे, हनुमान म्हात्रे, सुयोग म्हात्रे, अक्षय म्हात्रे, मीना म्हात्रे, मेघा म्हात्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज …

Leave a Reply