कंपनीमध्ये चोरी करणार्या चौकडीला अटक
पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील बारवई येथील कॅपेसिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये घरफोडी करून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल पळवणार्या चार जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून घरफोडीतील काही ऐवज हस्तगत केला आहे. या गुन्ह्यामध्ये एक विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सुद्धा समावेश आहे.
पनवेल तालुक्यातील बारवई येथील कॅपेसिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कंपाउंडच्या लोखंडी जाळ्या उचकटून अज्ञात चोरटयांनी गोडाऊनमध्ये प्रवेश करून बांधकासाठी करण्यात येणारे एकूण 42 डोकाबिम ज्याची किंमत जवळपास लाखो रुपये आहे. ती चोरून नेण्यात आले होते. या संदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, हवालदार महेश धुमाळ, सुनील कुदळे, शिपाई आकाश भगत, तुकाराम भोये आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी अनिल कातकरी, सोमनाथ पवार, शेखर वाघमारे व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी घरफोडी करून ते आदिवासीवादी येथे लपल्याची माहिती या पथकाला मिळाली. यानुसार या पथकाने चारही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून जवळपास 61 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक संजय गळवे करीत आहेत
सराईत दुचाकी चोर गजाआड
पनवेल : मोटरसायकल चोरी करणार्या दोन अट्टल चोरट्यांना खारघर पोलिसाने शिताफीने अटक केली आहे.
खारघर शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढ होत असून याबाबतच्या तक्रारी खारघर पोलीस ठाण्यात येत आहेत. त्यामुळे खारघर पोलिसांना चोरट्यांनी आव्हानच दिले होते, असे असताना खबर्याकडून मिळालेल्या माहितीनुसार खारघर पोलिसाने सापळा रचून आरोपी अतुल प्रभाकर काकफळे (वय 22, रा. करावे गाव सीवूड), विपुल विनोद जाधव ( वय 22, रा. बेलापूर गाव सीबीडी) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी याआधी खारघर शहरातून दोन मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले आहे.
आरोपीला अटक करून सखोल चौकशी केली असता त्यांनी केलेल्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. या वेळी त्यांच्याकडून खारघर पोलिसांनी एकूण एक लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी ज्ञानोबा धुळगंडे, गिरीश यादव तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील फिरोज आगा, प्रशांत जाधव, पोलीस नाईक सचिन सूर्यवंशी, मछीद्रा खेडकर, राहुल डावरे यांनी केली आहे.