मुरूड : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी (दि. 20) जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ नेते जनार्दन सदाशिव तथा आण्णा कंधारे यांच्यातर्फे मुरूडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मुरूड शेगवाडा येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्यातर्फे शनिवारी नगर परिषद कर्मचारी व सफाई कामगारांना मान्यवरांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी अॅड. महेश मोहिते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपचे मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष महेश मानकर, बाळा भगत, नरेश वारगे, प्रवीण बैकर, उमेश माळी, नसिम हनिफ उलडे, किशोर म्हसाळकर, सुनील खेऊर, संतोष खुडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.