Breaking News

द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात; एक ठार; सहा जण जखमी

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ढेकु गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 19) रात्री साडेसात वाजण्याच्या  सुमारास भरधाव ट्रकने तीन कारना धडक दिली. या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाले. गंभीर जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाळू रा निवगुणे हा कॉलीस कारचा चालक ठार झाला. क्वाँलीस कार मधील तीन इसम गंभीर जखमी व इरटिगा कार मधील तीन किरकोळ जखमी झाले

तमिळनाडूहून आलेला भरधाव ट्रक (एमएच-46,एएल-5215) द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात होता. ढेकू गावच्या हद्दीत या ट्रकने पुढे जाणार्‍या इरटिगा कार (एमएच-46,झेड-5215), स्काँडा कार (एमएच-17,बिएक्स-7773)  व क्वालीस कार (डिएन-09,सी-451) यांना जोरदार ठोकर दिली.  या अपघातात क्वॉलीस कारचा चालक बाळू रा. निवगुणे (वय 67, रा. काशेडी वेल्हे, जि. पुणे) गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. तर कारमधील मारुती निवगुणे (वय 79), सुभाष निवगुणे (वय 52), शशिकांत जाधव (वय 55, सर्व रा. काशेडी वेल्हे, जिल्हा पुणे), मनीष चव्हाण (वय 18), शिवपाल (वय 19, दोघे रा. उत्तर प्रदेश) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. किरकोळ जखमींना खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात तर गंभीर जखमींना कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटल दाखल करण्यात आले आहे. या अपघातात तीन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply