कामोठे : रामप्रहर वृत्त
श्रीराम मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का? या खासदार व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्याचे भाजपच्या युवा मोर्चाने गांभीर्याने घेत राज्यभरातून जय श्रीराम लिहिलेले पत्र खासदार पवार यांना पाठवण्याचा निर्धार प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला, त्याचाच भाग म्हणून भाजपा युवा मोर्चा कामोठे मंडळ तर्फे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाने कामोठे पोस्ट ऑफिस येथे खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईच्या वास्तव्याच्या ठिकाणी जय श्रीराम नावाचे 2500 पत्रे पाठवून प्रभू श्री राम यांच्या नावाचे स्मरण करून दिले. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सदस्य प्रशांत कदम, युवा नेते हॅप्पी सिंग, भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, उपाध्यक्ष रोहित घाडगे, अमित झावरे, अमित जाधव, प्रवीण कोरडे, मयांक कुमार, आदित्य भगत, किरण जाधव सुरेंद्र हल्लीकर, संतोष अम्रूते हे उपस्थित होते.