उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. चिरनेर हे महाविद्यालयाचे दत्तक गाव आहे. या गावात महाविद्यालयाच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एन. गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर मोकल, सरपंच संतोष चिर्लेकर, उपसभापती शुभांगी पाटील, ग्रामविकास अधिकारी रमेश पोफेरकर, महेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी रु. 13,614 किमतीची एकूण 147 पुस्तके ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी प्रगट वाचन करण्यात आले. यात मनीषा शर्मा, अक्षिता विमल, शुभांगी पाटील, प्रा. व्ही. एस. इंदूलकर, प्रा. डॉ. ए. आर. चव्हाण, विशाल पाटेकर, महेश पवार, प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे, प्राचार्य डॉ. बळीराम एन. गायकवाड आदींनी विविध ग्रंथांचे व कवितांचे प्रगट वाचन केले. या ग्रंथालय उद्घाटन सोहळ्यात उपसरपंच प्रियंका पाटील, ग्रामपंचायत सदस्य सविता केणी, किरण कुंभार, सचिन घबाडी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर, प्रा. एच. के. जगताप, प्रा. मयूरी मढवी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. अरुण चव्हाण यांनी मानले.