उरण : वार्ताहर
नैना खोपटा टाऊन प्लॅनिंगच्या ऑफीसर प्रांजली केणी यांच्यासोबत खोपटा टाऊन प्लॅनिंगबाबत उरणमधील नागरिक, ग्रामस्थांनी माहिती घेतली. त्यांनी प्लॅनिंगची माहिती मिळावी याबाबत निवेदनही दिले. खोपटा टाऊन प्लॅनिंग हे 32 गावातील गावाकर्यांना विश्वासात घेऊन करायचे आहे. उदाहरणार्थ गावात रस्ते, मैदान, शाळा, मंदिर, स्मशानभूमी, हॉस्पिटल, गटारे या सुविधा गावाकर्यांनी सुचवायच्या आहेत. डेव्हलपमेंट प्लॅन तयार होईल. याबाबतीत त्यांचे प्रतिनिधी दिवान पवार गावोगावी येऊन याबाबतची माहिती गावकर्यांना देतील, अशी माहिती चर्चेदरम्यान देण्यात आली. नैनाच्या ऑफीसर केणी यांनी सांगितलेे की, राज्य सरकारने त्यांना नैना खोपटे टाऊन प्लॅनसाठी सूचना दिल्या आहेत. गावकर्यांशी चर्चा करून प्लॅन करायचा आहे. तीन वर्षांत गावकरी सहमत असतील तर प्लॅन तयार होईल. गावकरी तयार असतील तरच खोपटा टाऊन प्लॅन तयार होईल अन्यथा होणार नाही, अशा प्रकारे केणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी भाजप उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, आवरे गावातील माजी उपसरपंच हरेश म्हात्रे, वशेणी गावातील सामाजिक कार्यकर्ते शशीकांत पाटील हे उपस्थित होते.