Breaking News

कर्जत तहसील कार्यालयाचा पायरी मार्ग हरवला गवतात

कर्जत : बातमीदार

टेकडीवरील कर्जत तहसील कार्यालयात जाण्यासाठी असलेली पायवाट गवतात हरवली आहे. सामान्य लोकांची वाट म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कधी गवतमुक्त करणार याकडे सार्‍यांचेच डोळे लागले आहेत. कर्जत तालुक्याचे मुख्यालय असलेले तहसील कार्यालय हे रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या टेकडीवर आहे. तेथे नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यातील 70 टक्के सामान्य लोक हे पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या पायर्‍यांच्या पायवाटेवरून जातात. पावसाळ्यात या पायवाटेच्या आजूबाजूला गवत वाढते. सार्वजनिक बांधकाम खात्याला ही पायवाट पावसाळ्यात आणि  पावसाळा संपल्यानंतर गवतमुक्त करावी लागते, मात्र त्यासाठी या पायवाटेचा वापर करणार्‍या सामान्य जनतेला दरवर्षी तहसील कार्यालयाला विनंती करावी लागते. यंदाच्या पावसाळ्यातही या पायर्‍यांच्या पायवाटेवर आणि आजूबाजूला गवत वाढले आहे, मात्र डिसेंबर महिना संपला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला या पायवाट मार्गाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. याबाबत जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

कर्जत तहसील कार्यालयात जाणार्‍या पायर्‍यांच्या पायवाटेवर गवत वाढले असून, एक मीटरहून अधिक रुंदीच्या पायर्‍या गवतात हरवल्या आहेत. त्यामुळे या पायवाटेचा वापर कमी झाला आहे, मात्र शासकीय अधिकार्‍यांना त्याकडे पाहायला वेळ नाही.

-हरिचंद्र वेहले, ग्रामस्थ, माले, ता. कर्जत

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply